ऐतिहासिक कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा !

Digital India
0

 


वडआर्चरी स्पर्धेत कु. संचिता नाईक हिचे सुवर्णपदक ; ऑल इंडिया स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात 

 बुध   

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आयोजित आंतरविभागीय आर्चरी ( धनुर्विद्या ) स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव येथील विद्यार्थिनी कु. संचिता शिवाजी नाईक हिने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या दैदीप्यमान यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची आसाम येथे होणाऱ्या अखिल भारतीय ( ऑल इंडिया ) आर्चरी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या संघात निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आंतरविभागीय आर्चरी स्पर्धा किसन वीर महाविद्यालय, वाई, जि. सातारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेत आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेत कु. संचिता नाईक हिने अचूक नेमबाजी, एकाग्रता, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आपल्या कौशल्यपूर्ण कामगिरीच्या बळावर तिने सुवर्णपदक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला.

       संचिताची अखिल भारतीय आर्चरी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात झालेली निवड ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत ती आपल्या खेळाच्या माध्यमातून विद्यापीठाचे आणि महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.या यशस्वी कामगिरीसाठी कु. संचिता नाईक हिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे जिमखाना विभागप्रमुख प्रा. गौरव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तिने स्पर्धेची तयारी केली, तर प्रशिक्षक शिवशंकर चोरड यांच्या मार्गदर्शनातून तिने आपल्या खेळात अधिक कौशल्य प्राप्त केले.

       कु. संचिता नाईक हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद डॉ. संजय क्षीरसागर, महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, जिमखाना विभागप्रमुख प्रा. गौरव जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच आसाम येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देऊन तिच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. कु. संचिता नाईक हिने मिळवलेले सुवर्णपदक आणि अखिल भारतीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही तिच्या मेहनतीची, जिद्दीची आणि क्रीडानिष्ठेची पावती आहे. तिच्या या यशामुळे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगावच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाची भर पडली असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top