प्रतिनिधी /संदीप लाड
श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे गावचे सुपुत्र भारत श्रीवर्धनकर यांची पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून आणि पोलीस दलातून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.भारत श्रीवर्धनकर यांनी पोलीस दलात आपल्या कामाचा ठसा उमटवला असून, त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. गालसुरे सारख्या छोट्या गावातून जिद्दीच्या जोरावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मारलेली ही झेप ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.या पदोन्नतीनंतर गालसुरे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. "कष्टाचे फळ नक्कीच मिळते, हे भारत श्रीवर्धनकर यांनी दाखवून दिले आहे," अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.त्यांच्या या निवडीमुळे केवळ गालसुरे गावाचेच नव्हे तर संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याचे नाव पोलीस दलात उंचावले आहे
