मामवली निरंजनवाडीची लेक माधुरी पारदुले हिची नवी मुंबई पोलीस दलात निवड

Digital India
0


प्रतिनिधी/संदीप लाड 


श्रीवर्धन तालुक्यातील मामवली-निरंजनवाडी येथील माधुरी नथुराम पारदुले हिने आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर नवी मुंबई पोलीस दलात स्थान पटकावले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून आणि विशेषतः मामवली निरंजनवाडी परिसरातून तिचे कौतुक होत आहे.माधुरीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगले होते. सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या बळावर तिने पोलीस भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे यशस्वीपणे पार केले. अखेर तिची निवड नवी मुंबई पोलीस दलात झाल्याने तिचे स्वप्न साकार झाले आहे.तिच्या या यशात तिचे वडील नथुराम पारदुले, आई नेहा पारदुले आणि कुटुंबीयांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठिंबा लाभला. ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, हे माधुरीने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.माधुरीच्या या गौरवशाली यशाबद्दल गावचे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि मित्रपरिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top