रा.जि.प शाळा रानवली मराठी येथे खाद्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Digital India
0


        

प्रतिनिधी /संदीप लाड 

जंक फूडला आळा बसण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा रानवली मराठी ता. श्रीवर्धन येथे खाद्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व मोठ्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कमी खर्चात आपल्या मुलांना पौष्टिक खाद्य कसे उपलब्ध करून देता येईल व आर्थिक व्यवहार कसे करावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्हा परिषद रानवली मराठी ता. श्रीवर्धन येथे पालकांनी 30 खाद्य स्टॉल लावले. या मध्ये विविध पदार्थ निर्मिती केली होती. मोदक, रवा लाडू, मेथी लाडू, शेंगदाणा लाडू, कडधान्य भेळ, इडली इ. पदार्थ पालकांनी बनविले होते. त्याची विक्री विद्यार्थिनी केली. नफा - तोटा , खरेदी विक्री याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्याने घेतला. 

       खाद्य महोत्सव नंतर सभा घेण्यात आली. सदर सभा सरपंच ग्रामपंचायत रानवली सुरेशदादा मांडवकर यांचे अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी नवनिर्वाचित उपसभापती पंचायत समिती श्रीवर्धनच्या पुजाताई प्रशांत शिंदे, सदस्या पंचायत समिती अस्मिता प्रदर्शन चोरगे, माजी सभापती बाबुराव चोरगे, मा. मंत्री भरतशेठ गोगावले यांचे स्वीय सहाय्यक राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य समीर फोपंलनकर, पत्रकार संदीप लाड , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कुणाला अडखळे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व पालक उपस्थित होते

    उत्कृष्ट पाककृती बनवणाऱ्या पाच महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यात दिपाली वसंत पालवे, सानिका शैलेश मांडवकर, वेदिका विजय मांडवकर, ताई बाजीराव कांबळे व प्रियांका राकेश पोतदार यांचा समावेश होता. 

       यावेळी मा. मंत्री भरतशेठ गोगावले यांचे स्वीय सहाय्यक राजू जाधव यांनी 36 विद्यार्थ्यांना स्पोर्ट जॅकेट वाटप करण्यात आले. सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षात 100% उपस्थित असलेल्या 11 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान ग्रामपंचायत सदस्य समीर फोपलनकर यांचे सौजन्याने करण्यात आला. 

    यावेळी उपसभापती पूजा प्रशांत शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शालेय प्रगती व उपलब्ध सुविधा याबद्दल कौतुक केले. खेड्यातून मुलांचा चांगला विकास होऊ शकतो या बद्दल समाधान व्यक्त केले. उन्हाळी शिबीर व पालक योगदान याबदल मार्गदर्शन राजू जाधव यांनी केले. शालेय विकास कसा साधला याबद्दल माहिती सरपंच सुरेशदादा मांडवकर यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकू पांगारकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक निलेश श्रीवर्धनकर यांनी केले. कार्यक्रमाला असंख्य महिला पालक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top