जावेळे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याची मागणी

Digital India
0

तालुका प्रतिनिधी/ संदीप लाड 

गेल्या काही दिवसांपासून जावेळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या लोकवस्तीच्या जवळ येत असल्याने ग्रामस्थांनी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. परिसरातील काही ठिकाणी बिबट्याचे पाऊलखुणा (ठसे) आढळले आहेत. 

 जावेळे येथील शेतकरी विजय रांगले यांची गुरे नेहमीप्रमाणे चरण्यासाठी जंगलात सोडली होती त्या गुरांपैकी दोन गुरे बिबट्यांनी मारली आहेत व यापूर्वी इतर शेतकऱ्यांची  पाच ते सहा मारल्याची  घटना समोर आली असून,काही ग्रामस्थांना बिबट्या दिसल्याने गावात भीतीचे  वातावरण निर्माण झाले असून यामुळे पशुपालक चिंतेत आहेत 

बिबट्यापासून मानवी जीवितास धोक्यापासून संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाने या घटनेची दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ वन विभागाकडे करत आहेत

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top