महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध;

Digital India
0


 *मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते नूतन सामाजिक सभागृहाचे लोकार्पण* 


प्रतिनिधी /संदीप लाड 

"जागतिक महिला दिन हा केवळ महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस नसून, समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाचा व्यापक विचार करण्याची संधी देणारा क्षण आहे," असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंत्री अदिती तटकरे त्यांच्या हस्ते द्वारकानगर दांडा बागमांडला येथील मूलभूत सुविधा २५१५ अंतर्गत (२० लक्ष )बांधण्यात आलेल्या  सामाजिक सभागृहाचे  उद्घाटन करण्यात आले.

महिलांना सामाजिक उपक्रमांना गती मिळावी, या उद्देशाने या सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. रिबन कापून अनावरण करून मंत्री तटकरे यांनी सभागृह ग्रामस्थांसाठी, विशेषतः महिला भगिनींसाठी खुले केले आहे

कार्यक्रमप्रसंगी मंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत  पंचायत समिती सदस्य अस्मिता चोरगे,महिला अध्यक्ष सबा फिरफिरे,माजी सभापती बाबुराव चोरगे,तालुका उपाध्यक्ष अमित खोत, राष्ट्रवादीचे नेते हिदायत कुद्रते ,दीक्षा टाकले आदीसह स्थानिक महिला व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top