प्रतिनिधी /संदीप लाड
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. या दिनाचे औचित्य साधून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदारांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तेच्या सेवेबद्दल पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना मानाचे 'पोलीस महासंचालक पदक' (DG Insignia) प्रदान करून गौरवण्यात आले. मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांना हे पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हे अन्वेषणात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या प्रतिष्ठेच्या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.या दिमाखदार सोहळ्याला जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
