प्रतिनिधी /संदीप लाड
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांचे मोठ्या उत्साहात भूमिपूजन संपन्न झाले. या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटणार असून स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तालुक्यातील कारिवणे, साखरोणे, कोलमांडले, रामवाडी, सायगाव, हुनेरवेळी, वाकलघर आणि करलास या गावांमध्ये विविध रस्ते, समाजमंदिर आणि इतर जनसुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय असून, दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत विकास पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या कार्यक्रमाला माजी आमदार तुकाराम सुर्वे, सभापती सुचिन कीर, माजी सभापती बाबुराव चोरगे, पंचायत समिती सदस्य अस्मिता चोरगे तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर, कार्याध्यक्ष संदेश काते, उपाध्यक्ष अमित खोत, ज्येष्ठ नेते हिदायत कुद्रते,महिला अध्यक्षा सबा फिरफिरे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक,जाफर अन्वरी शब्बीर फिरफिरे,अमेय कोसबे,लिलाधर रिकामे,अनंत लाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विकासकामांच्या माध्यमातून गावांचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगत स्थानिक कार्यकर्त्यांनी मंत्री तटकरे यांचे आभार मानले
