ऐतिहासिक बारवांसाठी शासन सकारात्मक - डॉ. किरण कुलकर्णी

Digital India
0


 

महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी IAS यांची ऐतिहासिक प्राचीन वारसा स्थळ वालूर येथील ऐतिहासिक बारवेश आणि श्री नागनाथ भगवान मंदिर व बारव तीर्थला भेट.


(डिजिटल इंडिया न्यूज सेलु तालुका पत्रकार परमेश्वर आंधळे)

सेलू: तालुक्यातील वालूर येथील ऐतिहासिक बारवेश डाॅ. किरण कुलकर्णी यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी उपस्थित संजय साडेगावकर, मल्हारीकांत देशमुख यांच्यासह उपस्थित मान्यवर, दुसर्‍या छायाचित्रात हातनूर येथील हेमाडपंती श्री नागनाथ भगवान मंदिर व ऐतिहासिक बारवेची पहाणी करून नागरिकांशी डाॅ. कुलकर्णी यांनी संवाद साधला.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. २६) सेलू तालुक्यातील वालूर येथील प्रसिद्ध ऐतिहासिक बारवेला भेट दिली.यावेळी बोलताना डाॅ. कुलकर्णी म्हणाले, 'या बारवेचा लौकिक मी आजवर ऐकून होतो, आज प्रत्यक्षात पाहून आनंद वाटला. या बारवेचे जतन व संवर्धन योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करू.

यावेळी सरपंच संजय साडेगावकर, पंचायत समिती सदस्य गणेश मुंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शैलेश तोष्णीवाल, पं. स. चे गटविकास अधिकारी उदय जाधव, शासनाच्या बारव समितीचे सदस्य मल्हारीकांत देशमुख, इतिहास संशोधक अनिल स्वामी, अनिल बडगुजर, नागेश जोशी, दत्ता बारहाते आदी उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा व मागोवा पर्यटनाचा ही दोन पुस्तके डॉ. कुलकर्णी यांना भेट देण्यात आली.

हतनूरच्या प्राचीन मंदिरालाही भेट.....

डॉ. कुलकर्णी यांनी सेलू तालुक्यातील हतनूर येथील हेमाडपंती प्राचीन श्री नागनाथ भगवान मंदिर व बारवेलाही भेट दिली. या वास्तूला राज्य संरक्षित स्थळाचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मंदिर संस्थानच्या वतीने डाॅ. कुलकर्णी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी उदय जाधव, बाळासाहेब आंधळे, दत्तराव आंधळे, आसाराम काकडे, अंकुश शेळके, गोविंद शेळके, पोलिस पाटील रामचंद्र पारवे, महेंद्र गाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top