किरण कुंबीरकर जिल्हा प्रतिनिधी
वूमन वेलफेअर क्लब मधील कार्यशील महिला सभासदांनी अँकर फाउंडेशन तर्फे कॅन्सर रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी चालवण्यात येणाऱ्या मोफत अन्नदान सेवेला स्वतः उपस्थित राहून तेथील गरजू लोकांना अन्नदान सेवा करण्याचा लाभ घेतला.तसेच आमच्या कार्याची प्रशंसा करून आमच्या संस्थेला सढळ हस्ते मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच वूमन वेलफेअर च्या अध्यक्षा यांनी सर्व समाजाला असे आव्हान केले की द अँकर फाउंडेशन ही संस्था कर्करोगाच्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या सोबतच्या कुटुंबांसाठी मोफत अन्न स्वयंपाकघर चालवते, जिथे गरजू लोकांना आठवड्यातून तीन वेळा मोफत जेवण दिले जाते.
समाजाच्या सहकार्याने आणि देणगीनेच ही सेवा ते आतापर्यंत चालवत आले आहेत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार छोटीशी देणगी देऊन या उदात्त कार्याला पाठिंबा देऊ शकता. तुमची छोटीशी मदतही गरजू व्यक्तीसाठी मोठी मदत होऊ शकते.तुम्ही सहयोग करू इच्छित असल्यास, कृपया तुम्ही अँकर फाउंडेशन ह्या संस्थे शी संपर्क करू शकता.
