दामिनी महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Digital India
0


प्रभागातील हजारो महिलांची उपस्थिती



श्रीवर्धन प्रतिनिधी : संदीप लाड

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पंचायत समिती श्रीवर्धनच्या तालुका अभियान व्यवस्थापक कक्षाच्या माध्यमातून दामिनी महिला प्रभागसंघ, बागमांडले यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी कुणबी समाज हॉल, नगरपालिका शेजारी, वाणी आळी, श्रीवर्धन येथे झालेल्या या कार्यक्रमाला महिला बचत गटांच्या पदाधिकारी व सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद सदस्य वैभवी  कोमनाक, पंचायत समिती श्रीवर्धनचे सभापती सचिन  किर, उपसभापती पूजा प्रशांत शिदे, पंचायत समिती सदस्य अस्मिता प्रदर्शन चोरगे,प्रभारी उपविभागीय अधिकारी हेमलता शेरेकर ,पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक स्वप्नील जाधव तसेच गटविकास अधिकारी राजू किरवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, स्वावलंबन, बचत गटांचे बळकटीकरण तसेच भविष्यातील विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दामिनी महिला प्रभागसंघाच्या अध्यक्ष शालिनी विलास चाफे, सचिव स्वरा समीर पुलेकर, खजिनदार भाविका भूपेंद्र काप आणि प्रभाग समन्वयक किशोर गोरटे यांच्यासह विविध ग्रामसंघांचे पदाधिकारी, सदस्य व स्वयं सहायता समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्नेहमेळाव्यामुळे महिला सदस्यांमध्ये संवाद, एकजूट आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दामिनी महिला प्रभागसंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top