श्रीवर्धन पोलिसांची मोठी कारवाई; श्रीवर्धनमध्ये खैर लाकडाची अवैध वाहतूक पकडली

Digital India
0


प्रतिनिधी, संदीप लाड

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन पोलिसांनी एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैधरित्या खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारी गाडी जप्त करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना गुप्त बातमीदारामार्फत एक विश्वासार्ह माहिती मिळाली होती. एका संशयास्पद गाडीमधून (क्र. MH-08-AP-1339) अवैध खैर लाकडाची तोड करून वाहतूक केली जात असल्याचे समजताच, पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली.

पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने बागमांडला जेटी येथे सापळा रचून सदर संशयास्पद गाडी अडवली आणि ताब्यात घेतली. या गाडीची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैध तांबड्या रंगाचे मौल्यवान खैर लाकुड आढळून आले.याप्रकरणी पोलिसांनी गाडी चालक प्रकाश यशवंत तांदे (रा. कांदिवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्याकडे लाकडाबाबत चौकशी केली असता, त्याने हे खैर लाकूड असल्याचे मान्य केले. सदर लाकूड आणि गाडी पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीवर्धन वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून चालक व गाडीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही धडाकेबाज कामगिरी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक मा. अभिजित शिवथरे आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/१५९२ कयापाक, पोशि/३०२ ठोंबरे आणि पोशि/८८४ शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top