प्रतिनिधी संदीप लाड
उमेद MSRLM अभियान,कृषी विभाग आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या यशोदा महिला शेतकरी गट, वडवली यांच्या माध्यमातून भात शेतीची चार सूत्री नियंत्रित पद्धतीने लागवड करण्यात आली. या उपक्रमात महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केला.
या उपक्रम करिता श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती मा. श्री. सचिन किर, गटविकास अधिकारी मा. श्री. राजू किरवे आणि तालुका कृषी अधिकारी सौ. श्रद्धा डुबरे यांचे मार्गदर्शन मध्ये राबविण्यात आला असून
यावेळी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री. स्वप्नील जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सहायक कृषी अधिकारी श्री. पंकज पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटर श्री. अभिजित गावडे, प्रभाग समन्वयक तथा मेंटर श्री. किशोर गोरटे, निमंत्रक सौ. मिनाक्षी पेडणेकर आणि सौ. विनिता किर उपस्थित होत्या.
या उपक्रमात यशोदा महिला शेतकरी गटाच्या पुढील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला –
सौ. सरिता कांतेश कांबळे सौ. दीक्षा दीपक कांबळे सौ. शुभांगी सुभाष पेरवे सौ. विनंती अनिकेत कांबळे सौ. उजिता अनिल नाक्ती सौ. विजया तेजस भायदे सौ. शुभांगी श्रीकांत भायदे सौ. रसिका दिनेश पेरवे सौ. वृषाली जनार्धन भायदे सौ. प्रियांका मुकेश कांबळेसौ. नमिता संदेश बिराडी
याशिवाय परिसरातील अनेक महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार सूत्री नियंत्रित पद्धतीमुळे पाण्याचा काटेकोर वापर, उत्पादन खर्चात बचत, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उत्पादनात वाढ करणे शक्य होत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. तसेच या उपक्रमामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांकडूनही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
