गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांची अलोट गर्दी

Digital India
0


विशाल स्वामी  जिल्हा प्रतिनिधी29 जुलै 2026 सोलापूर 

गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीत आज पहाटेपासूनच लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक  भागांतून भक्त मोठ्या संख्येने अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमा हा अक्कलकोटमधील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जात असल्याने दरवर्षी मोठी भाविकांची उपस्थिती असते.

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, समाधी मठ आणि परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, भाविक "श्री स्वामी समर्थ" नामाचा अखंड जयघोष करत भक्तिभावाने दर्शन घेत आहेत. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत राहावी तसेच भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरी संपूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून, सर्वत्र श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top