(विशाल स्वामी @ जिल्हा प्रतिनिधी)
सोलापूर शहरातील सिद्धेश्वर साखर कारखाना, सवेरा नगर येथील किर्लोस्कर कंपनीसमोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वन-वे वाहतूक सुरू असताना आज दोन डंपर आणि एका कारचा भीषण अपघात झाला.
धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही डंपरच्या केबिनचा चक्काचूर झाला. अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.या अपघातात जखमींची संख्या किंवा जीवितहानीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक वन-वे करण्यात आली होती. अशा परिस्थितीत झालेल्या या अपघातामुळे वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
