कर्मवीर रावसाहेब थोरात महाविद्यालयात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न

Digital India
0


वणी प्रतिनिधी :- रितेश पारख 

वणी कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वणी येथे विज्ञान विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागातील पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म तसेच जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ .एम.आर. भामरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे होते. यावेळी नानासाहेब दाते, माजी प्राचार्य आडके सर तसेच भूसाळ सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पौष्टिक व दुर्मिळ रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन सादर केले. प्रत्येक रानभाजीचे पोषणमूल्य, औषधी उपयोग आणि आहारातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि विज्ञान विभागाच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन करण्यासाठी व रानभाज्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोहिते, सूत्रसंचालन प्रा. जी. डी. पाटील, तर आभार प्रदर्शन प्रा. महाले यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top