डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाची प्रकृती गंभीर

Digital India
0


विभागीय प्रतिनिधी( महेशप्रसाद दिक्षीत )

अमळनेर :- अमळनेर येथील रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे संरक्षण दल (RPF) मधील जवान जयपाल सिंह यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रेल्वे स्थानकातील आरपीएफ कार्यालयात घडली. संबंधित जवानाने शासकीय शस्त्रातून स्वतःवर गोळी झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

जखमी जवानाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

फोटो : आत्महत्येचा प्रयत्न करणारे आरपीएफ जवान

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top