राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन श्रीवर्धन येथे उत्साहात साजरा; पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झेंडा वंदन

Digital India
0


प्रतिनिधी/ संदीप लाड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन श्रीवर्धन येथे मोठ्या उत्साहात आणि अभिमानात साजरा करण्यात आला.वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्रीवर्धन शहरातील पक्षाचे कार्यकर्ते श्री स्वप्नील पाब्रेकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंदार भाई तोडणकर यांच्या शुभहस्ते झेंडा वंदन करण्यात आले.

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर माजी आमदार तुकाराम सुर्वे,सभापती सचिन कीर ,महिला तालुका अध्यक्ष सबा फिरफिरे श्रीवर्धन नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अनंत गुरव ,जिल्हा परिषद सदस्य वासंती गुणाजी माजी सभापती बाबुराव चोरगे शहर अध्यक्ष बबन चाचले,  यांच्यासह सर्व नगरसेवक व समित्यांचे सभापती,विविध ग्रामपंचायतचे सरपंच तालुक्यातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. 

ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी पक्षाच्या आजवरच्या प्रवासाला उजाळा दिला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या प्रसंगी तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर यांनी व्यक्त केला 

उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले



आज होईल ना बातमी ही


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top