शेतकऱ्यांचे 130 कोटी थकले, गोकुळ कारखान्याविरोधात मोठे आंदोलन, पैसे देण्यासाठी होणार जप्तीची कारवाई?

Digital India
0

 



(विशाल स्वामी @जिल्हा प्रतिनिधी)

सोलापूरच्या धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे 58 कोटी रुपयांचे बील थकवलेले आहे. भाजपशी संबंधित दत्ता शिंदे हे गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. 2025 -26 सालाच्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही.गोकुळ साखर कारखान्याने ऊस बिल थकवल्याच्या निषेधार्थ सोलापुरात शेतकरी आक्रमक झाले आहेत. येथे गोकुळ कारखान्याने शेतकऱ्यांचे 130 कोटी रुपयांचे ऊस बिल थकवल्याने मागील 17 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. दरम्यान, गेल्या 17 वर्षांपासून हे आंदोलन सुरू असूनही कोणीच त्याची दखल न घेतल्याने या शेतकऱ्यांनी शेवटी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांकडून शेतकऱ्यांचा मोर्चा तलावाच्या अलीकडेच अडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तरीदेखील आक्रमक शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून आपला निषेध नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार भाजपशी संबंधित दत्ता शिंदे हे गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top