बांधकाम व्यवसायिकावर पैसे घेतल्याचा खोटा आरोप आणि बदनामी करण्याचा प्रयत्न

Digital India
0


धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.


किरण कुंबीरकर जिल्हा प्रतिनिधी 

धारावीतील एका बांधकाम व्यवसायिकावर एक लाख रुपये घेतल्याचा खोटा आरोप करून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. किरण कुंबीरकर असे तक्रारदाराचे नाव आहे ते बांधकाम व्यवसायात सक्रिय आहेत तर सुरेंद्र दौलतराव जाधव ह्यांचे माहीम विभागात एक व्यवसायिक दुकान आहे.

सदर दुकानातील रिपेरिंग चे काम करण्यासाठी सुरेंद्र जाधव हे किरण कुंबीरकर यांच्या कडे आले होते पण दुकानाचे काम करण्यास त्यानी नकार दिल्या नंतरही काम करत नाही म्हणून सुरेंद्र जाधव यांनी किरण कुंबीरकर यांना फोन करून शिवीगाळ तसेच वाद घातला आणि किरण कुंबीरकर यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला याप्रसंगी किरण कुंबीरकर यांनी सुरेंद्र जाधव यांच्या विरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात एक लाख रुपये घेतल्याचा खोटा आरोप करून बदनामी केल्याची तक्रार दाखल केली आहे. 

बांधकाम व्यवसाययिकावर खोटा आरोप करणे आणि बदनामी करणे हि एक गंभीर बाब आहे.जर तुमच्या व्यवसायावर किंवा प्रतिमेवर असा हल्ला होत असेल तर तुम्ही कायदेशीर किंवा धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top