*मंत्री नितेश राणे आणि खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती*
प्रतिनिधी /संदीप लाड
श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथे मत्स्यबंदर विकसित करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा बुधवार, दिनांक १३ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता उत्साहात संपन्न झाला. या भागातील मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे बंदरे व मत्स्य विकास मंत्री मा. ना. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकणचे भाग्यविधाते व रायगडचे लोकप्रिय खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब लाभले होते. या मत्स्यबंदराच्या विकासामुळे स्थानिक स्तरावर मासेमारी व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून मच्छीमारांच्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न आता सुटणार आहे.या ऐतिहासिक प्रसंगी माजी आमदार तुकाराम सुर्वे,राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. महंमदभाई मेमन, श्रीवर्धन मतदार संघाचे अध्यक्ष श्री. उदयदादा बापट, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष श्री. मंदार तोडणकर, सभापती श्री. सचिन किर माजी सभापती बाबुराव चोरगे,मंगेश कोमनाक,सबा फिरफिरे,यांच्यासह विविध पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रकल्प श्रीवर्धनच्या किनारपट्टी भागातील आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला
