श्रीवर्धन विभाग गवळी समाज संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा भोस्ते येथे उत्साहात संपन्न

Digital India
0


*अध्यक्ष लीलाधर रिकामे यांचा सेवागौरव तरुण वर्गाला समाजकार्यात सक्रिय होण्याचे आवाहन*


प्रतिनिधी - संदीप लाड

श्रीवर्धन विभाग गवळी समाज संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मौजे भोस्ते येथील श्रीमती गीता दत्तात्रेय तटकरे सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

समाजातील एकजूट आणि भविष्यातील वाटचाल यावर या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेची सुरुवात यादव कुळाचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी समाजातील ज्येष्ठ मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*तरुणांच्या सहभागावर भर:*

सभेमध्ये उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात युवक वर्गाच्या समाजकार्यातील अल्प सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली. समाज संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. युवकांसाठी विविध उपक्रम राबवण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.अध्यक्ष लीलाधर रिकामे यांचा सत्कार:या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे संघटनेचे अध्यक्ष लीलाधर रिकामे यांचा झालेला जाहीर सत्कार. श्री. लिलाधर रिकामे हे नुकतेच बँक सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल, त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून समाजाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.अहवाल वाचन व आभार:संस्थेचे सचिव श्री सुनील दर्गे यांनी मागील वर्षाचा आढावा आणि संस्थेच्या प्रगतीची सविस्तर माहिती सभासदांना दिली. सभेचे नेटके सूत्रसंचालन खजिनदार मोहन कांबळे यांनी केले. सभेच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार संदीपभाऊ लाड यांनी मानले.

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेमुळे श्रीवर्धन विभाग गवळी समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे

सभेला विश्वस्त प्रकाश रिकामे हंगामी अध्यक्ष नारायण रिकामे,अध्यक्ष लिलाधर रिकामे,मुंबई अध्यक्ष गणेश साबळे,उपाध्यक्ष संजय रिकामे ,नथुराम रिकामे,स्थानिक सचिव सुनील दर्गे,मुंबई सचिव किशोर लाड,स्थानिक सहसचिव संदीपभाऊ लाड,खजिनदार मोहन कांबळे ज्येष्ठ दिगंबर महाडिक,मुंबई सल्लागार अशोक काते, पांडुरंग दाभोलकर,महादेव महाडिक, बाळाराम रिकामे,मोहन तटकरे यांच्यासह सायगाव गौलवाडी,निगडी गौलवाडी,पांगलोळी गौळवाडी,वडघर गौलवाडी,जांभूळ गौलवाडी,गालसुरे काठी, गुलधे,श्रीवर्धन येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top