सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन या संस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

Digital India
0


प्रतिनिधी /संदीप लाड 


मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत श्रीवर्धन तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी / विद्यार्थीनींचा गुणगौरव सोहळा सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन या संस्थेचे सभागृहात बुधवार दिनांक २० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला.

या गुणगौरव सोहळयामध्ये इयत्ता १० वी च्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. मिहीर जितेंद्र देशमुख गोखले स्कूल श्रीवर्धन, कु. सौम्या किरण सावंत स्टार ॲकॅडमी हायस्कूल, कु. निष्ठा उमेश चौलकर वि. गो. लिमये विद्यामंदिर, दिवेआगर, कु. संस्कृती राजकुमार कोलथरकर, हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालय, कु. अरिशा तन्वीर चोगले ए. आर. उंड्रे इंग्लिश स्कूल, रानवली इत्यादी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

या कार्यक्रमामध्ये महर्षी कर्वे मॉडेल स्कूल श्रीवर्धन चे प्राचार्य मा. श्री. दत्तात्रय राणे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री. विनय वैद्य सर यांनी केले. तसेच वाचनालयाचे अध्यक्ष श्री. मनोज गोगटे यांनी मनोगत व्यक्त केले या गुणगौरव सोहळयाकरीता वाचनालयाचे कार्यवाह श्री. गणेश सावंत, सदस्य डॉ. राजेश तोडकर, पालकवर्ग, वाचनालयाचे सभासद, वाचक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top