जामनेर शहरात गोवंश तस्करी विरुद्ध मोठी कारवाई

Digital India
0

 



प्रतिनिधी ( महेशप्रसाद दिक्षित )

आज दि.२६/०५/२०२६ रोजी जामनेर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने  जवळपास 60 ते 65 गोवंशांची जुना बोदवड रोड,घरकुल परिसर, मदनी अशा विविध सहा ठिकाणांहून अवैधरित्या जमा करून ठेवलेल्या गो वंशाची  धाड टाकून सुटका करण्यात येऊन त्यांची रवानगी जळगाव येथील बाफना गोशाळेत करण्यात आली आहे. व सदरील घटनेचे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया संध्याकाळ पर्यंत सुरु होती

पोलीस प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार बकरी ईद पूर्वी झालेल्या या धडक कारवाईची आज शहरात दिवस भर चर्चा सुरू होती.

अशा प्रकारची  अवैध गो वंश वाहतूक , किंवा साठवण नागरिकांना आढळल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top