हदगाव महेंद्र धोंगडे
सध्या महागाईच्या काळामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे कोणत्याही व्यक्तीला विवाहासाठी न परवडणारा खर्च लक्षात घेऊन वेळ आणि आर्थिक खर्चाला बगल देत विवाह सोहळे करणे ही काळाची गरज आहे.
श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून हदगाव तालुक्यातील बामणी फाटा येथे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह मेळावा आयोजित करण्यात येत असते यावर्षी 14 मे रोजी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
यामध्ये 4 हिंदू रीती रिवाजानुसार तर 20 बौद्ध धम्म पद्धतीच्या नियमानुसार लावण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने वधू-वरांना साहित्यासाठी भेटवस्तू व प्रमाणपत्र मेळाव्याचे आयोजक सुनील भाऊ बाराटे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
या मेळाव्याला उपस्थित हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळिकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर ,बहुजन टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष माधव दादा जमदाडे ,भीम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष शंकर दादा शेळके, बामणी फाटा मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चव्हाण पाटील उंचाडकर,भाजपा जिल्हा सरचिटणीस तातेराव वाकोडे पाटील, व्यंकटेश लोणे ,डॉ संजय पवार ,मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी,सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे, पत्रकार महेंद्र धोंगडे चंद्रकांत भोरे, प्रभाकर दहिभाते इस्माईल पिंजारी, यासह सामाजिक कार्यकर्ते साहेबराव नरवाडे गजानन अनंतवार परिसरातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व नातेवाईक या सर्वधर्मीय सामुदायिक मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
