सुरेशदादा जैन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिरं संपन्न

Digital India
0


प्रतिनिधी :- ( महेशप्रसाद दिक्षित ) जामनेर जि. जळगाव

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री , जामनेर तालुक्याचे लाडके आमदार व जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ  आदरणीय ना. श्री गिरिषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेशदादा जैन औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात दि 16/05/2027 रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकूण 22 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजोपयोगी कार्यास हातभार लावला

 सदरील कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर या प्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे सचिव जितेंद्र रमेश पाटील संचालक चंद्रकांतजी देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सर्व विदयार्थी , प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. आर डी. शिंपी सर तर समन्वयक म्हणून प्रा. आर .बी  चव्हाण सर यांनी जबाबदारी पार पाडली.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मनोज बारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी योग्य ते परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला...


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top