नवी मुंबईतील पहिले ‘अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटर’

Digital India
0



 उच्च दर्जाच्या स्ट्रोक उपचार सेवांसाठी हॉस्पिटलने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा* 

 :वार्ताहर 

 खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्सला त्यांच्या अॅडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरसाठी क्वालिटी अँड अॅक्रेडिटेशन इन्स्टिट्यूट (QAI) कडून मान्यता प्राप्त झाली असून हे नवी मुंबईतील पहिले ‘अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटर’ ठरले आहे. ही मान्यता मिळाल्याने उच्च दर्जाच्या स्ट्रोक उपचार सेवांसाठी हॉस्पिटलने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय निकषांनुसार प्रगत स्ट्रोक केअर सेवा पुरविली जाते. वेळीच निदान, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान, उत्तम स्ट्रोक युनिट आणि विविध तज्ज्ञांच्या समन्वयातून काम करणारी मल्टिडिसिप्लिनरी टीमचा समावेश असलेली मजबूत यंत्रणा या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. यामुळे हॉस्पिटल अत्यंत गुंतागुंतीच्या स्ट्रोक प्रकरणांनाही आपल्या कार्यक्षमतेने यशस्वीपणे हाताळू शकते, ज्यामुळे जलद निर्णयप्रक्रिया, उपचार आणि सुधारित परिणाम साध्य होतात.

 डॉ. पवन ओझा( संचालक - न्यूरोसायन्स) म्हणाले, स्ट्रोक हा मेंदूमध्ये ब्लॉकेजेस किंवा रक्तस्रावामुळे उद्भवतो. यामध्ये अचानक अशक्तपणा, बोलण्यात अडचणी जसे की अचानक बोलणं थांबणं आणि काही काळ बोलता न येणं किंवा चेहरा वाकडा होणे अशी लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास यामुळे आयुष्यभरासाठी अपंगत्व, पक्षाघात, बोलताना अडचणी येणे, स्मरणशक्ती किंवा आकलनविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. स्ट्रोक व्यवस्थापनासाठी अत्यंत समन्वयित पद्धत आवश्यक असते आणि वेळ हा यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये आम्ही एक सर्वसमावेशक अॅक्युट स्ट्रोक केअर पाथवे तयार केला आहे, ज्यामुळे रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्याक्षणीच त्यांना तत्काळ उपचार मिळतात. प्रगत इमेजिंगद्वारे जलद निदानापासून ते वेळेवर औषधोपचार आणि न्यूरो-इंटरव्हेन्शनल उपचारांपर्यंत प्रत्येक टप्पा मेंदूचे नुकसान कमी करण्यासाठी आणि रुग्णाच्या पुनर्प्राप्तीला गती देण्यासाठी आखण्यात आला आहे. क्वालिटी अँड अॅक्रेडिटेशन इन्स्टिट्यूट (QAI) ही आरोग्यसेवा संस्थांना उच्च दर्जाचे निकष पूर्ण केल्याबद्दल प्रमाणित करणारी सर्वोच्च संस्था आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या स्ट्रोक केअर सेवांना मिळालेली ही मान्यता त्यांच्या उत्तम, कार्यक्षम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रणालीचे प्रतीक आहे. यामुळे हॉस्पिटलची उच्च दर्जाची स्ट्रोक सेवा पुरविण्याची क्षमता अधोरेखित होते, तसेच अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणांनाही वेगाने आणि अचूकतेने हाताळण्याची ताकद स्पष्ट होते.

डॉ ओझा पुढे सांगतात की, स्ट्रोक केअर केवळ आपत्कालीन उपचारांपुरती मर्यादित नसून ती पोस्ट-स्ट्रोक रिहॅबिलिटेशनपर्यंत विस्तारलेले आहे, ज्याचा उद्देश दीर्घकालीन पुनर्प्राप्ती साध्य करणे हा असतो. आम्ही वेळीच उपचार, रुग्णांमध्ये जनजागृती, सक्षमीकरण आणि न्यूरो-रिहॅबिलिटेशन सपोर्ट यावर भर देतो, जेणेकरून स्ट्रोकग्रस्त रुग्णांना पुन्हा स्वावलंबी होता येईल आणि त्यांचे जीवनमान सुधारता येईल. क्युएआय मान्यतेमुळे आमच्या सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळली आहे.

डॉ. हरीश नाईक(न्यूरोसर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई ) म्हणाले, स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे, ज्यामध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, अन्यथा आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकते. आम्ही वेळीच आणि योग्य सेवा रुग्णांपर्यत पोहोचविण्यासाठी सदैव तत्पर आहोत.

संदीप जोशी (केंद्र प्रमुख - मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई)  म्हणाले, या मान्यतेमुळे हॉस्पिटलने नवी मुंबई आणि आसपासच्या भागात प्रगत स्ट्रोक केअर सेवांसाठी विश्वासार्ह केंद्र म्हणून आपले स्थान आणखी बळकट केले आहे. यामुळे रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार पुरविले जातात.

नीरज लाल, (रिजनल डायरेक्टर -महाराष्ट्र आणि कर्नाटक विभाग, मेडिकव्हर हॉस्पिटल्स) सांगतात की, क्युएआयकडून मिळालेली ही मान्यता आमच्या टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. स्ट्रोक सारख्या गंभीर प्रसंगी रुग्णांना विश्वासार्ह आणि प्रगत उपचार पुरविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top