नेरळ, ममदापुर येथे वैद्यकीय उपचार फक्त ३० रुपयांत!!

Digital India
0


     कर्जत तालुक्यामधील नेरळ येथे आता वैद्यकीय उपचार हे फक्त ३० रुपयांमध्ये मिळणार आहेत.

"ह्यूमन सपोर्ट फॉउंडेशन" ह्या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शमशूद्दीन शेख यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या वैद्यकीय सेवेमुळे सर्व सामान्यांना याचा लाभ होणार आहे. अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती घडली तसेच सर्व-सामान्यांना न परवडणारे दर देखील त्याच प्रगतीनं वाढले. अशा परिस्थिती मध्ये लोकांची भावना लक्षात घेता त्यांना माफक दारात वैद्यकीय सेवा, औषधे, रक्ताच्या चाचण्या तसेच तज्ञ डॉक्टरांचे सल्ले व उपचार देण्याकरिता हा उपक्रम हाती घेण्याचा चंग शेख साहेबांनी बांधला.

      ११ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी ह्या उपचार केंद्राचे  आपल्या आईच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकार्पण केले. कोणताही मोठा गाजवाजा न करता कोणत्याही मोठ्या नेत्याला किंवा सेलिब्रेटी ला न बोलावता आपल्या आईच्या हस्ते उपचार केंद्राचे उद्घाटन यशस्वीरित्या पार पाडले या बद्दल त्यांचे विशेष कौतुक सर्वच समाजाकडून केले जात आहे.

      या उपचार केंद्रात महिलांकरिता विशेष स्त्री रोग तज्ञ डॉक्टर (श्रीमती. स्नेहल कुंभार) सुद्धा उपलब्ध असणार आहेत. सकाळी १० ते दुपारी २ ह्या वेळेत स्त्री रोग तज्ञ सेवेकरीता उपलब्ध असणार आहेत. तसेच सायंकाळी सर्वसाधारण आजारावरील डॉक्टर (श्री. श्रेयस कुंभार) उपलब्ध असणार आहेत. 

        सर्वासामान्य जनतेच्या हितासाठी डॉ. शमशूद्दीन शेख ह्यांनी हा जो उपक्रम राबवीला आहे त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. प्रायव्हेट डॉक्टर आणि हॉस्पिटल च्या अगडबंब खर्चामुळे सामान्य व गरीब लोकांसाठी हे उपचार केंद्र वरदान ठरणार आहे.

नेरळ मधील ममदापुर हा ग्रामीण भाग असून येथे ही सेवा सर्वांकरिता वरदान ठरणार आहे.

       अगदी ३० रुपयांमध्ये वैद्यकीय उपचार व इतर सर्वत्र ठिकाणी आकारल्या जाणाऱ्या रक्त चाचण्या ह्या येथे ५०% इतक्या माफक दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच इतर औषधे हे देखील ४० ते ६०% कमी दरात ह्या वैद्यकीय उपचार केंद्रामध्ये मिळणार आहेत.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top