वणी परिसरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात; मांडे आणि आमरसाचा महाप्रसाद

Digital India
0


वणी प्रतिनिधी -:रितेश पारख 


   वणी शहर व परिसरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध हनुमान मंदिरांमध्ये धार्मिक विधी, महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

वणी येथील जगदंबा माता (देवी मंदिर) चौकातील मागील वर्षी जिर्णाेध्दार केलेल्या हनुमान मंदिरात ‘जय श्री महारुद्र हनुमान सेवा समिती’ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदीर व परीसरात आकर्षक विद्युत रोषनाई करण्यात आली होती. पहाटे ५:३० वाजता हनुमंताचा महारुद्र अभिषेक व महापूजा करण्यात आली.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा मांढ्यावरची पुरणपोळी आंबारसाचा महाप्रसाद. यंदा समितीच्या वतीने एक हजार किलो लालबाग आंब्याचा रस, ११५ किलो डाळीचे खापरावरील पुरणपोळी ( मांडे) सार-भात, शेव आणि पापड अशा भरगच्च मेजवानीचे वाटप करण्यात आले. आज सांयकाळी सात वाजेपासून रात्री १० वाजे पर्यंत सुमारे ४ ते ५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

@ दक्षिणमुखी हनुमान मंदिरात विद्युत रोषनाई - 

वणी येथील कडगल्ली येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ‘बजरंग मित्र मंडळा’च्या वतीने जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मंदिरात नयनरम्य विद्युत रोषनाई करण्यात आली होती. पहाटे सव्वा पाचला वाजता महारुद्र अभिषेक, महापूजा त्यानंतर सत्यनारायण महापुजा करण्यात आली. यानंतर मसाले भात, बुंदी व ताक मठ्ठा असा महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले.

विश्रामबागपाडा येथील हनुमान मंदिरातही उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला. येथे आदल्या रात्री रात्रभर जागरणाचा कार्यक्रम पार पडला, तर जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. वणी परिसरातील सर्वच हनुमान मंदिरांमध्ये ‘बजरंग बली की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top