भडगावात पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचा संचार…!

Digital India
0


भडगाव : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच कार्यकर्त्यांच्या वैचारिक, सामाजिक व नेतृत्वक्षमतेच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत भडगाव मंडळाचा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडत आहे. बाळद रोडवरील डी.एड. कॉलेज येथे ४ व ५ एप्रिल दरम्यान आयोजित या महत्त्वपूर्ण उपक्रमास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

          कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत माता, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन करून राष्ट्रभक्तीच्या साक्षीने या महाअभियानाची सुरुवात करण्यात आली. विचार, संस्कार आणि संघटन या त्रिसूत्रीवर आधारित वातावरणात प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला.

             या प्रशिक्षण महाअभियानात कार्यकर्त्यांना पक्षाचा इतिहास, विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती, जनसंपर्काची तंत्रे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. “अंत्योदय” या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास आणि राष्ट्रहित सर्वोपरि मानण्याची प्रेरणा या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये जागवली जात आहे.

            प्रशिक्षणाच्या सत्रांमध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. पोपटतात्या भोळे यांनी भारतीय जनता पक्षाचा इतिहास, त्याची वैचारिक परंपरा आणि राष्ट्रनिर्मितीतला वाटा यावर प्रभावी प्रकाश टाकला. तर भाजपा नेत्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी पक्षाची कार्यपद्धती, संघटनशक्तीची उभारणी आणि कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले. त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना नवदिशा आणि नवी ऊर्जा प्राप्त झाली.

            या महाअभियानास श्री. अमोलभाऊ शिंदे, प्रतापनाना पाटील, सौ. पुनमताई पाटील, मंडळ अध्यक्ष श्री. विनोद नेरकर  यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेशी निष्ठा राखत समाजसेवा आणि जनसंपर्क यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

         प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी नव्या जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

        भडगाव मंडळात आयोजित हे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान केवळ प्रशिक्षणाचा कार्यक्रम नसून कार्यकर्त्यांच्या मनामनांत राष्ट्रनिष्ठा, सेवा आणि संघटन यांची ज्योत प्रज्वलित करणारा प्रेरणादायी सोहळा ठरत असल्याची भावना यावेळी सर्वत्र व्यक्त करण्यात आली.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top