वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वणी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाला.महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रम प्रास्ताविक मध्ये प्राचार्य डॉ.एस.एस.काळे यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 वार्षिक उपक्रम अहवाल विषयी माहिती दिली..कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध लेखक व साहित्यिक श्री. बापुराव देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परिश्रम, चिकाटी व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एकनाथ खांडे होते. यावेळी मा. श्री. राकेश थोरात , सतीश जाधव, प्रा. आर. एल. पाटील, मा. श्री. घुले सर, मा. श्री. जी. टी. गोरे, मा. हिरे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. जे. डी. पवार यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. यु. बी. देशमुख यांनी मानले.या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. ए. आर. फुलारी यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
