मौजे गुळधे येथे श्री हनुमान मंदिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

Digital India
0

 



प्रतिनिधी/ संदीप लाड 

 

श्रीवर्धन तालुक्यातील मौजे गुळधे येथे ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि श्रद्धेतून साकारलेल्या नूतन श्री हनुमान मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत मंगलमयी वातावरणात पार पडला. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळाचे स्थानिक अध्यक्ष परशुराम अडगावले व मंडळाचे प्रमुख सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.


मान्यवरांची मांदियाळी:

या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार तुकाराम सुर्वे, माजी सभापती बाबुराव चोरगे, माजी पंचायत सदस्य मंगेश कोमनाक, कुणबी समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम साळवी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत गिजे सरपंच पल्लवी हुमणे,गुळधे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष परशुराम अडगावले मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोमनाक उपस्थित होते. 

उपस्थित मान्यवरांनी नूतन मंदिराच्या उभारणीबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले आणि हनुमान भक्तीने गावात सुख-शांती नांदो, अशा शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची लाभलेली सक्रिय उपस्थिती. तसेच महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, युवक आणि युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 'जय श्रीराम' आणि 'जय हनुमान'च्या जयघोषाने संपूर्ण गुळधे गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

धार्मिक विधी आणि महाप्रसाद:

मंदिराच्या उद्घाटनानिमित्त शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी, पूजा करण्यात आले.महाआरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

 सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, मुंबई मंडळ आणि तरुण मंडळाने विशेष परिश्रम घेतले.





Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top