अकोला विमानतळाचे"श्री संत गजानन महाराज विमानतळ" नामकरण करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी

Digital India
0


प्रतिनिधी अकोला

अकोला:- महाराष्ट्र शासनाने अकोला विमानतळाचे भुसंपादनाकरीता २०८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने, अकोला येथील शिवणी विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम प्रगतीत असून अल्पावधीत सदरचे विमानतळ लोकसेवेत रुजू होणार आहे. आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांनी अकोले कर  ची मागणीची पूर्तता केली.  अकोला शहरानजिक शेगाव, जि. बुलढाणा येथे श्री संत गजानन महाराजांचे पावन वास्तव्य असल्याने शेगाव नगरीला विदर्भाची पंढरी असे संबोधले जाते या ठिकाणी लाखो भाविक-भक्त व वारकरी श्री संत गजानन महाराजांच्या आशिर्वाद व दर्शनासाठी येत असतात. शेगाव येथे येण्याकरीता मध्य रेल्वेची तसेच महामार्गाची व्यवस्था आहे. परंतु देश आणि परदेशातून येणा-या श्रद्धाळू भाविकांना संत नगरी शेगाव येथे येण्याकरीता कोणतीही हवाई वाहतूक उपलब्ध नाही. त्या कारणाने अकोला शहरातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणाचे काम तातडीने करण्याकरीता आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी शासनास विनंती केली आहे. तसेच आमदार व खासदारद्वयांनी अकोला येथील शिवणी विमानतळाचे श्री संत गजानन महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने निर्णय व्हावा व सदर नामकरण करण्याकरीता केंद्र शासनाला शिफारस करण्यास विनंती केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सचीव यांना निर्देश दिले. प्रस्ताव सादर करून लवकरच मंत्री मंडळाची मान्यता प्राप्त होऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे त्यामुळे विदर्भातील पंढरी व संत गजानन महाराज संत परंपरा संस्कृतीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सावरकर आणि खासदार धोत्रे यांच्या मागणीची पूर्तता केली आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top