उरण मध्ये जेएनपीटी परिसरात गंभीर स्वरूपी अपघात,धडा पासून शीर अलग

Digital India
0


महाराष्ट्र प्रतिनिधी

                 उरण  न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हाद्दीमध्ये गणेश बेंझोप्लास्ट कंपनीच्या समोरील रस्त्यावर जेएनपीटी कडून पीयूबी इमारतीकडे जाण्याच्या वायजंक्शन रोडवर मोठा अपघात झाला.आहे. या अपघातात सुषिलकुमार भैय्यालाल यादव वय 33 वर्षे  व्यवसायाने  चालक, राहणार अहीरोली, कुथुपूर, मढीयाहूं, जि. जौनपूर, राज्य उत्तरप्रदेश 222161 यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका भयंकर स्वरूपाचा होता कि सदरच्या अपघतामध्ये सुषिलकुमार यादव याचे शीर धडापासून वेगळे झाले होते. 

       अपघाताची माहिती पोहवा गणेश बासरे(19090) यांनीं न्हावाशेवा पोलीस ठाण्यात खबर दिली असता  कोणताही विलंब न लावता न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीकांत नायडू यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत   घटनास्थळाला भेट दिली. मृत व्यक्तीच्या अंगावर आधार कार्ड, अनुज्ञप्ती आणि वन प्लस कंपनीचा मोबाईल सापडला घटनेची प्राथमिक तपासणी  श्री नायडू यांनी करून अज्ञात वहानाने सदरच्या इसमास जोरदारपणे ठोकर मारून कोणत्याही प्रकारची माहिती न देता पळून गेला असल्याचे नमूद करूनउपचरा साठी दाखल केले असता येथील डॉक्टरानी त्यास दाखलपूर्व मयात म्हणून घोषित केले. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात या आपघताची नोंद अ.मृ.रजी.क्र.03/2026 अशी कलम 194 BNSS अन्वये करण्यात आली असून न्हावाशेवा पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत .   


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top