*हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे दर्शन*
प्रतिनिधी/ संदीप लाड
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने रानवली ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने रविवारी संध्याकाळी 6:00 वाजता 'इफ्तार पार्टी'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात सर्वधर्मसमभावाचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात यावेळी देण्यात आला.
रानवली येथील ग्रामपंचायत प्रांगण/शाळा मैदान) येथे आयोजित या कार्यक्रमात गावातील मुस्लिम बांधवांसह इतर सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकत्र बसून इफ्तार केला.
यावेळी कार्यक्रमाला गावचे सरपंच सुरेश मांडवकर, उपसरपंच आताउल्ला जळगावकर,समाजसेवक राजू जाधव,ग्रामविकास अधिकारी अभिजित माने व सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच मुस्लिम समाज अध्यक्ष आयुब खान पठाण,बावा सोगे,मौजम पठाण,मेहबूब फोफलनकर ,आझाद खान,लियाकत बीजापुरी, ताजुद्दीन खान,यांच्यासह परिसरातील सर्व समाजातील अध्यक्ष व सदस्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच सुरेश मांडवकर म्हणाले की, "रानवली हे गाव नेहमीच गुण्यागोविंदाने राहण्यासाठी ओळखले जाते. सर्व सण एकत्र साजरे केल्याने आपापसातील प्रेम आणि विश्वास वाढतो. इफ्तारच्या निमित्ताने सर्व समाजातील लोक एकत्र आल्याचा आनंद आहे
