प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकारांच्या नावांची घोषणा
मुंबई : ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकन आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी केली. २०२४ या वर्षातील राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी स्थळ, छबिला, कुर्ला टू वेंगुर्ला, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, घात, स्वरगंधर्व सुधीर फडके, घरत गणपती, नवरदेव बीएस्सी. अॅग्री., नाच गं घुमा, मुक्काम पोस्ट देवाचं घर या दहा चित्रपटांना
अंतिम फेरीचे नामांकन प्राप्त झाले आहे. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून सावित्रीच्या लेकी चित्रपटातील धनश्री भोसले, दृष्टी मोरे, रसिका खंडागळे, एजल कालीकुरी यांना पुरस्कार जाहीर
झाला आहे. अंतिम घोषित पारितोषिकांमध्ये तांत्रिक विभागात उत्कृष्ट कला दिग्दर्शन संतोष फुटाणे, महेश कोरे, उत्कृष्ट छायालेखन - महेश आणे, महेश लिमये, उत्कृष्ट संकलन -अभिजित देशपांडे, विजय कलमकर, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण सतीश दडस, उत्कृष्ट ध्वनी संयोजन संजय चतुर्वेदी, उत्कृष्ट वेशभूषा गणेश लोणारे, शिवाजी करडे, उत्कृष्ट रंगभूषा संजय सिंग, संतोष गिलबिले यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.
...या कलाकार, तंत्रज्ञांना संधी
नामांकनामध्ये उत्कृष्ट अभिनेता सुनील बर्वे, मिलिंद शिंदे, गश्मीर महाजनी, उत्कृष्ट अभिनेत्री- स्वाती गोतावळे, नंदिनी चिकटे, सुरुची अडारकर, उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री - श्वेता पारखे, रितिका श्रोत्री, तृप्ती शेडगे, उत्कृष्ट विनोदी अभिनेता -नितीन कुलकर्णी, अमेय परब, प्रकाश भागवत, सहायक अभिनेता- तारानाथ खिरतकर, जनार्दन कदम, धनंजय मांडवकर, सहायक अभिनेत्री सुषमा देशपांडे, नम्रता संभेराव, क्षिती जोग, उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता सुमित पाटील, जितेंद्र बर्डे, आदीश वैद्य, उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-भक्ती घोगरे, काजल परदेशी, अनघा राणे, सर्वोत्कृष्ट कथा-जयंत सोमलकर, जितेंद्र बर्डे, छत्रपाल निनावे, उत्कृष्ट पटकथा - जयंत सोमलकर, छत्रपाल निनावे, अमरजीत आमले, उत्कृष्ट संवाद- जयंत सोमलकर, राम खाटमोडे, विनोद वणवे, गणेश मंगेश पंडित, उत्कृष्ट गीत गुरु ठाकूर, रॉकसन, अमरजीत आमले, उत्कृष्ट संगीत- अक्षय खोत, अमित राज, मोहित कुलकर्णी, उत्कृष्ट पार्श्वसंगीत- संतोष मुळेकर, समीर म्हात्रे, आदित्य बेडेकर, उत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, उत्कृष्ट पार्श्वगायिका- आनंदी जोशी, राजेश्वरी पवार, आर्या आंबेकर, उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - उमेश जाधव, राहुल ठोंबरे, सुजित कुमार यांचा समावेश आहे.