*खा. सुनील तटकरे यांनी केलेल्या विकासकामांचा दृष्टिकोन पाहता जनतेचा सौ वैभवी मंगेश कोमनाक व सौ अस्मिता प्रदर्शन चोरगे सौ पूजा प्रशांत शिंदे यांना वाढता पाठिंबा*
प्रतिनिधी /संदीप लाड
श्रीवर्धन तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचा सर्वत्र बोलबाला दिसून येत आहे. युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. बागमांडला पंचायत समिती व आराठी जिल्हा परिषद मतदारसंघात युतीचा गावागावात घरोघर प्रचार सुरू असून सर्वच ठिकाणी मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आराठी जिल्हा परिषद गटातून सौ वैभवी मंगेश कोमनाक या तर बागमांडला पंचायत समिती गणातून सौ अस्मिता प्रदर्शन चोरगे व आराठी पंचायत समिती गणातून सौ पूजा प्रशांत शिंदे या युतीच्या उमेदवार चांगल्या मताधिक्यानी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे
श्रीवर्धन तालुक्यात खासदार सुनील तटकरे,मंत्री अदिती तटकरे यांच्या मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत यापुढे ही महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास होऊ शकतो हा विश्वास व्यक्त होत असल्याने सर्व ठिकाणी युतीचे उमेदवारांना पाठिंबा वाढत आहे
