श्रीवर्धन पोलिसांचा रूट मार्च

Digital India
0


 *आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची ग्वाही* 


प्रतिनिधी /संदीप लाड 

श्रीवर्धन: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 व्यवस्थित पाडण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामार्फत शहरासह पोलिस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च (पथसंचलन) काढण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड,उपनिरीक्षक संदीप पाटील ,प्रदीप राठोड,खरात मॅडम यांच्या नेतृत्वाखाली 35 अंमलदार,58 होमगार्ड या पथसंचलनात हजर होते 

यावेळी श्रीवर्धन एसटी स्टँड येथे दंगा काबू योजना घेण्यात आलीशहरातील मुख्य रस्तेसह जसवली,आराठी मेटकर्णी ,वाळवटी, या संवेदनशील लोकवस्तीच्या भागातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पायी चालत सुरक्षिततेची ग्वाही दिली,  तसेच समाजकंटकांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.शांतता व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण,व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे यासाठीनिवडणुका शांततेत पार पडाव्या म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता2023/168 प्रमाणे 60 जणांना नोटीस बजावण्यात आलेली आहे 42 जणांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता126प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे

01 व्यक्तीवर भारतीय नागरिक सुरक्षा 128प्रमाणे08 व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 129 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तर 05 व्यक्तींवर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे तो शांततेत पार पाडण्यासाठी व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस  निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top