भंडारी समाजाच्या महिलांचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

Digital India
0

 


नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आकर्षण


श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी संदीप लाड 

अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन–म्हसळा यांच्या श्रीवर्धन शहर विभागीय कमिटीच्या वतीने श्रीवर्धन शहरातील भंडारी समाजाच्या महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ कसबा भंडारी समाज मंदिर, श्रीवर्धन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमानिमित्त श्रीवर्धन शहरातील भंडारी समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

या वेळी अखंड भंडारी समाजाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, तसेच श्रीवर्धन दांडा भंडारी समाज व महिला मंडळ, कसबापेठ भंडारी समाज व महिला मंडळ आणि नवीपेठ भंडारी समाज व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भंडारी समाजाची थोडक्यात ओळख

भंडारी समाज हा कोकणातील एक प्राचीन, कष्टकरी व स्वाभिमानी समाज म्हणून ओळखला जातो. सामाजिक एकता, सांस्कृतिक परंपरा, महिलांचा सन्मान व शिक्षणाला प्राधान्य ही भंडारी समाजाची वैशिष्ट्ये आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड भंडारी समाज सेवा संघ विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत आहे.

सदर कार्यक्रमातून समाजातील महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top