*पक्षप्रवेशात आराठी,निगडी येथील युवा कार्यकर्त्यांचा समावेश*
श्रीवर्धन प्रतिनिधी/ संदीप लाड
श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा माजी मेमन समाजाचे अध्यक्ष जाफर भाई मेमन यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच कार्यसम्राट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव येथे एका कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला मंत्री भरत शेठ गोगावले यांनी जाफर मेमन व सहकारी यांच्या शिवसेना पक्षात स्वागत केले
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके,मतदारसंघ संपर्क प्रमुख सचिन पाटेकर तालुका अध्यक्ष ओंकार शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
जाफर भाई मेमन यांनी राष्ट्रवादीतून शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे श्रीवर्धन मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला चांगला फायदा होईल व पक्ष संघटना अधिक बळकट होईल असे बोलले जात आहे
