वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "निर्भय कन्या अभियान प्रशिक्षण कार्यशाळा" घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस.काळे अध्यक्षस्थानी होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वैशाली जाधव, डॉ.अंजली राजगुरू आणि श्रीमंती अपेक्षा बा-हाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.श्रीमती वैशाली जाधव यांनी महिला व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्यार्थिनींना बहुमूल्य मार्गदर्शन केले. डॉ. अंजली राजगुरू यांनी महिला मानसिक आरोग्य या विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
याप्रसंगी श्रीमती अपेक्षा बाराहाते यांनी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षणाचे धडे दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस. एस. काळे यांनी महिला सबलीकरण संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. वाय.एम. साळुंके विद्यार्थी विकास अधिकारी आर. व्हि. गांगुर्डे कार्यक्रम समन्वयक श्रीमती एम. एल. शिंदे उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. टी. ठाकरे यांनी केले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. एल. शिंदे यांनी केले, आभार प्रदर्शन श्रीमती के. एन. गडाख यांनी केले, या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
