केनडियरचे व्हॅलेन्टाईन्स-डे कलेक्शन

Digital India
0


साजरा करत आहे आधुनिक प्रेमाचा उत्सव


मुंबई,

 : यंदाच्या व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने, 'केनडियर बाय कल्याण ज्वेलर्स' घेऊन आले आहेत एक अशी प्रेमभावना, जी थेट काळजाला स्पर्श करेल. सौंदर्यासोबतच नात्यांमधील ओलावा आणि खोली जपणाऱ्या 'मॉडर्न रोमान्टिक्स'साठी हे कलेक्शन खास साकारण्यात आले आहे. आमचे नेकपीसेस आणि इअररिंग्सचे हे व्हॅलेंटाईन डे कलेक्शन, पारंपरिक 'हार्ट' डिझाईनला आधुनिक आणि स्टायलिश रूपात सादर करते.


सोन्याचा कोमल उबदारपणा, हिऱ्यांचे लखलखते तेज आणि गुलाबी रत्नांची मोहक साद... या दागिन्यांचा प्रत्येक कण म्हणजे एक सुंदर अनुभव आहे. यात कोणताही बडेजाव नाही, आहे ती फक्त एक शांत नजाकत आणि साधेपणा; जो तुमच्या प्रत्येक लहानशा हास्याचा आणि प्रत्येक मोठ्या विजयाचा सोबती बनेल. 'केनडियर'चे हे दागिने केवळ अलंकार नाहीत, तर तुमच्या आयुष्यातील सुखाच्या क्षणांचे आणि अविस्मरणीय टप्प्यांचे हक्काचे सोबती आहेत.


केनडियरच्या व्हॅलेंटाईन्स डे कलेक्शनमधील हे 'इनवॅलर' डायमंड पेंडंट आणि स्टड इयररिंग्स म्हणजे अनंताचे शाश्वत प्रतीक आणि हृदयाच्या आकाराचे गुलाबी रत्न यांचा एक अद्भुत संगम! हृदयाच्या स्पंदनांत सामावलेले ते अथांग प्रेम, आणि गुलाबी तेजात झळकणारा हा युगायुगांचा करार! हिऱ्यांनी मढवलेले रोझ गोल्ड आणि या अनंत प्रेमाचा मिलाफ तुमच्या व्यक्तिमत्वाला एक रोमँटिक झळाळी प्रदान करेल, तर त्यासोबतचे मॅचिंग हार्ट इयररिंग्स एक कोमल आणि मोहक प्रकाश विखुरतात. एकत्र परिधान करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करण्यासाठी डिझाइन केलेला हा सेट, 'सोबत' असण्याचा एक सुंदर अनुभव आहे. चिरंतन नाते आणि प्रेमाच्या अविस्मरणीय क्षणांचा उत्सव साजरा करण्यासाठी ही एक सर्वोत्तम भेट ठरेल.

लॉवेल डायमंड पेंडेंट आणि स्टड इअररिंग्स सेट: प्रेमाचे एक मूक वचन! या सेटमधील 'स्विर्ल' डिझाईन म्हणजे सोबत चालत राहण्याचे आणि निरंतर प्रवाहाचे प्रतीक जणू दोन जीव एकमेकांत अलवार मिसळून जात आहेत.

हार्टोरा डायमंड सेट: प्रेमाच्या तेजस्वी रूपाचा एक देखणा उत्सव!" केनडियरच हा पेंडेंट आणि इअररिंग्स सेट प्रेमाच्या सर्वात लखलखत्या रूपाची साक्ष देतो.

वेल्वेट ब्लूम डायमंड इयररिंग्स : म्हणजे फुलांची सुकोमल नाजूकता आणि हिऱ्यांच्या दिव्य तेजाचा देखणा संगम! हिऱ्यांच्या उमलत्या पाकळ्यांनी नटलेली ही कलाकृती, फुलांच्या नैसर्गिक लावण्याचे दर्शन घडवते.

लवेक्सा डायमंड इयररिंग्स : सोन्याची उबदार चमक आणि हिऱ्यांच्या नाजूक ओळीने साकारले असून, ते आकार आणि तेजाचा एक अनोखा मिलाफ सादर करतात.

लोविटा डायमंड इअररिंग्ज: सोन्याची ऊब, हिऱ्यांची चमक आणि गुलाबी रत्नांचा मऊपणा एकत्र विणतात - काळाबरोबर अधिक खोल आणि गहिऱ्या होत जाणाऱ्या नातेसंबंधांचे प्रतीक आहेत.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top