प्रतिनिधी रायगड.
दि. १९ फेब्रुवारी २०२६ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी झाली. सौशिल्या सोसायटी ममदापुर नेरळ येथे देखील नेत्रदिपक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. सौशिल्या उत्सव समईतीचे पदाधिकारी संदीपान कांबळे, मंगेश दिपक, सोमनाथ शिंदे, वैभव गायकवाड, चेतन वाघमारे, सुमित दत्ता समवेत सर्व रहिवासीयांनी एकत्र येऊन जयंती कार्यक्रम आनंदात साजरी केला. जयंती कार्यक्रमात चिमुकले देखील वेगवेगळी वेशभूषा करून उत्सवात सामील झाले.
पाक रमजान चा महिना सुरु आहे आणि मुख्यत: ममदापुर नेरळ हा भाग मुस्लिम बहुल असला तरी सौशिल्या सोसायटी मध्ये जयंती उत्सव साजरी करताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे सूंदर असे प्रतीक दिसून आले. प्रत्येकाने आपापल्या परीने शिवरायांना अभिवादन केले व सामाजिक सलोखा राखत एक - दुसऱ्यांना शुभेच्छा दिल्या. "छत्रपती शिवाजी महाराज की जय"...! म्हणत संपूर्ण परिसर दुमदुमाला होता. पोवाड्याच्या गाण्यांनी वातावरण गर्जत होते, प्रत्येकाच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती.
