*कार्यक्रमात श्रीवर्धन पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या सौ अस्मिता प्रदर्शन चोरगे यांचा सत्कार*
प्रतिनिधी/ संदीप लाड
भारतीय संस्कृतीतील परंपरा आणि महिलांमधील स्नेहभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कारिवणे महिला मंडळ यांच्या तर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक 22/2/2026 रोजी दुपारी 3 वाजता बोरीवली टाटा पॉवर साईनाथ मंदिर येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मुंबई मंडळाचे अध्यक्ष CA मनोज रामाणे व श्रीवर्धनचे माजी सभापती बाबुराव चोरगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्रीवर्धन पंचायत समितीवर बहुमतांनी विजयी झालेल्या महिला मंडळाच्या सदस्या सौ अस्मिता प्रदर्शन चोरगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
त्यानंतर उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून, तिळगूळ आणि वाण देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजितयावेळी पंचायत समिती सदस्य अस्मिता चोरगे यांनी महिला सक्षमीकरणावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमासाठी कारिवणे ग्रामस्थ मंडळाचे मुंबई अध्यक्ष मनोज रामाणे, प्रमुख पाहुणे माजी सभापती बाबुराव चोरगे,कारिवणे सरपंच गीता चोरगे, मुंबई महिला मंडळ अध्यक्ष मानसी रामाणे ,सचिव दिशा पाटेकर, सुरेखा रामाणे,पूनम पाटेकर यांच्यासह असंख्य महिला युवती उपस्थित होत्या
