वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात आणि नागमोडी पद्धतीने आयशर ट्रक चालवून इतर प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी दोन चालकांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वणी - पिपंळगाव रस्त्या दरम्याव कन्हैया ढाबा ते मावडी फाट्या दरम्यान १८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित पांडुरंग भालेराव (रा. तिसगाव, ता. दिंडोरी) हे त्यांच्या स्कोडा कारने (क्र. MH 47 S 1766) तिसगाव येथून पिंपळगावमार्गे वणीच्या दिशेने जात होते.
सकाळी ६:५० वाजेच्या सुमारास कन्हैया ढाबा परिसरात समोरून येणाऱ्या दोन आयशर चालकांनी रस्त्यावर धुमाकूळ घातला. आयशर वाहन बेदरकारपणे आणि नागमोडी (ZIG-ZAG) पद्धतीने वाहने चालवत होते. फिर्यादीने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, चालकांनी गाडी न थांबवता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आयशर क्र. MH 15 JC 3111 चा चालक ऋषीकेश एकनाथ बर्डे (रा. देवगाव, ता. निफाड) आयशर क्र. MH 15 HX 3111 यावरील चालक सचिन जीवितास धोका निर्माण होईल असे वर्तन केल्या प्रकरणी अभिजित भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वणी पोलिसांत गुन्हा दाखल केेला. तसेच दोन्ही आयशर चालकांना ताब्यात घेवून त्यांची नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्लेकिल्ला असे वदवून घेवून सहाय्यको पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, पोलिस उपनिरीक्षक किरण जगदाळे यांनी गावातील प्रमुख रस्त्याने दिंड काढून महामार्गावर स्टंटबाजी किंवा बेदरकारपणे वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकार आढळल्यास अशाच प्रकारची कडक कारवाई केली जाईल असा इशारा नागरिकांमध्ये देण्याचा प्रयत्न केला.
