श्रमदानातून समाजमंदिराला नवे रूप एकतेच्या बळावर दांडा भंडारी समाजाचा आदर्श उपक्रम

Digital India
0


श्रीवर्धन प्रतिनिधी/संदीप लाड 

श्रीवर्धन येथील दांडा भंडारी समाजाच्या वतीने समाजमंदिर परिसरात श्रमदानाच्या माध्यमातून पाण्याची पाईपलाइन टाकणे व संपूर्ण परिसराची साफसफाई करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत हे काम पूर्ण केले आणि समाज एकतेचा प्रभावी संदेश दिला.

समाजमंदिरात पाण्याची सोय व्हावी यासाठी नवीन पाईपलाइन टाकण्यात आली. तसेच परिसरातील कचरा व गवत काढून स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामुळे समाजमंदिर अधिक सुस्थितीत व उपयोगी बनले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी कोणत्याही बाह्य यंत्रणेकडे न पाहता समाजबांधवांनी स्वतः पुढाकार घेत श्रमदानातून काम पूर्ण केले.

उपक्रमानंतर सर्वांसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी “समाज एकता जिंदाबाद” असा नारा देत एकजुटीचे महत्व अधोरेखित करण्यात आले. “आपण एकत्र असलो तर कोणतेही काम अशक्य नाही” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


या स्तुत्य उपक्रमामुळे समाजात एकात्मता वाढण्यास मदत झाली असून, भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top