के. आर. टी. हायस्कूल, वणी येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र

Digital India
0


वणी प्रतिनिधी :-रितेश पारख 

वणी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित के. आर. टी. हायस्कूल, वणी येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२६ शुक्रवार (दि. २०) पासून सुरू होत आहे. त्यानुसार वणी केंद्र क्रमांक (११७०) ची आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.या केंद्रावर एकूण ४२१ परीक्षार्थी प्रविष्ट होत असून, त्यांच्यासाठी २२ वर्गखोल्यांमध्ये नियोजनबद्ध आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर के. आर. टी. हायस्कूल, वणी; संत ज्ञानेश्वर विद्यालय, मावडी; संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, वणी; तसेच किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूल, वणी या चार विद्यालयांतील परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षेच्या कालावधीत परीक्षा दालनात मोबाईल, कॅल्क्युलेटर, कॅमेरा असलेली घड्याळे व मौल्यवान वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांकडे ओळखपत्र व प्रवेशपत्र असणे अनिवार्य राहणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक डी. बी. पाटील (केंद्र संचालक), उपमुख्याध्यापक आर. व्ही. निकम (उपकेंद्र संचालक) आणि एच. एच. पवार यांनी दिली.

परीक्षा सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी जी. बी. उगले, आर. बी. कोल्हे, एस. के. सूर्यवंशी, पी. जी. चारोस्कर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top