वणी येथिल भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी सागर गांगुर्डे

Digital India
0



वणी प्रतिनिधी:- रितेश पारख 


भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमहोत्सवाचे औचित्य साधून वणी येथे दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी (२०२६–२७) च्या नवीन कार्यकारिणीची निवड दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी वणी येथील बुद्ध विहारात एकमताने करण्यात आली.

या बैठकीत जयंतीमहोत्सवाच्या संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन, सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी व युवकांना संविधानाच्या विचारांशी जोडण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी सर्वानुमते सागर रमेश गांगुर्डे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर अजय हरेश गांगुर्डे यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. जयंतीमहोत्सवातील विविध उपक्रमांची धुरा अध्यक्ष सागर गांगुर्डे यांच्यावर एकमताने देण्यात आली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली—उपाध्यक्ष : तुषार किशोर मोरे खजिनदार : विशाल विश्वनाथ गांगुर्डे सह-खजिनदार : साहिल दीपक गांगुर्डे

सचिव : सुहास दिलीप गांगुर्डे सह-सचिव : प्रवीण मनोहर गांगुर्डे कलेक्शन प्रमुख : विकी बाळासाहेब जाधव सदस्य : सनी संजय गांगुर्डे, राज संतोष गांगुर्डे

या समिती सल्लागार व मार्गदर्शक माजी उपसरपंच किरण गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुर्डे, ज्येष्ठ नेते रविकुमार सोनवणे, अनिल दा.गांगुर्डे शांताराम गांगुर्डे, राजन गांगुर्डे, अनिल ज. गांगुर्डे,या वेळी सुनिल गांगुर्डे, शरद जाधव, संविधान गांगुर्डे, गौतम गांगुर्डे, बुद्धभूषण शिरसाठ, कैलास धुम, अमोल गांगुर्डे, विकी दुर्धवळे, संतोष गांगुर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार, सामाजिक समता, शिक्षणप्रबोधन, संविधान मूल्यांची जपणूक व युवकांसाठी मार्गदर्शक उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन केले. अध्यक्ष सागर गांगुर्डे यांनी सर्वांच्या सहकार्याने जयंतीमहोत्सव अधिक व्यापक व अर्थपूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top