वणी महाविद्यालयात मानसिक आरोग्य जनजागृती व्याख्यान.

Digital India
0


वणी प्रतिनिधी:-रितेश पारख 

 मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला,वाणिज्य व विज्ञान विद्यालय वणी येथे मानसिक आरोग्य जनजागृती व्याख्यान संपन्न झाले. राष्ट्रीय कार्यबल अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.काळे. यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.वाय.म.साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकात जागृत अवस्थेपासून झोपेपर्यंत आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. आपण सकारात्मक विचार करावी असे मत त्यांनी व्यक्त केले मा..पी.जी.दुसाने, समुपदेशक ( ग्रामीण रुग्णालय वणी ) यांनी मनाची चेतन अवस्था, वशीकरण विद्या, मानाचा अभ्यास,ध्यान धारणा, एकाग्रता साधने, ध्येयावर लक्ष केंद्रित करणे. यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पी. एम. कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. व्ही.एस.लाडे यांनी केले कार्यक्रमासाठी डॉ.एस.जी.लोखंडे व प्रा.वाय.आर.मोहन उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top