प्रतिनिधी/ संदीप लाड
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पतंगे हॉल जसवली तळा येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सर्व मान्यवरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली
या शोकसभेला महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिवादन केले
यावेळी शोकसभेला उपस्थित महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे,माजी आमदार तुकाराम सुर्वे,ज्येष्ठ नेते महमद मेमन,भाजपचे नेते प्रशांत शिंदे, उदय बापट, यांनी आपले मनोगत व्यक्त केले
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांचा ,निर्भीड, निर्णयक्षमता,शिस्तप्रिय विनोदी स्वभाव गुण राज्याच्या विकासातील योगदानाचा गौरव केला, महाराष्ट्रसाठी सतत झटणारे नेते म्हणून अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रेरणादायी उपस्थितांनी नमूद केले यावेळी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते
